सोलापूर । प्रतिनिधी सोलापूर शहरातील व्यापारीपेठेतील सर्व दुकान यापुढे रविवारसह आठवड्यातील सातही दिवशी, सोशल डिस्टंसिंग च्या नियमांना अधीन राहून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याबाबतचा सुधारित आदेश महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी प्रसिद्ध केला आहे. All shops in Solapur will now be open on Sundays Deputy Commissioner Dhanraj Pandey
जे दुकानदार सोशल डिस्टंसिंचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक आणि दुकान बंद करण्याची कारवाई होईल तसेच जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई होईल असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
सोलापूर महानगरपालिकेने 1 सप्टेंबर 20 पासून शहरातील प्रत्येक घराला प्रतिमहा 50 रुपये तर व्यवसायिक आस्थापनांना 60 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत प्रतिमहा उपयोगकर्ता शुल्क लागू करण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.घनकचरा संकलनासाठी हे शुल्क आकारण्यात येणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज