मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील सेवा निःशुल्क करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. यामुळे आता ओपीडी शुल्कासह अगदी विविध चाचण्याही मोफत करता येणार आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यासाठी आग्रही असून याविषयीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.
राज्यात २३ जिल्हा रुग्णालये, १० हजार ७८० उपकेंद्रे, तर १९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. नाममात्र शुल्क आकारून या रुग्णालयांत रुग्णांवर उपचार तसेच चाचण्या केल्या जातात.
यासाठी बाह्यरुग्ण नोंदणी १० रुपये, आंतररुग्ण शुल्क २० रुपये आहार शुल्क १० रुपये, हिमोग्लोबिन चाचणी २० रुपये, लघवी चाचणी ३५ रुपये, आदी शुल्क आकारण्यात येते. यासाठीचे शुल्क २०१५ मध्ये निर्धारित करण्यात आले आहे.
सरकारी रुग्णालयातील या सर्व तपासण्या, चाचण्या निःशुल्क करण्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली होती. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज