मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र यावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंध व्हावा, महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडावा, सुखसमृद्धी यावी यासाठी विठुरायाच्या चरणी साकडे घातले आहे, असे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील यांनी सांगितले.
अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल वाढदिवसानिमित्त अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.
संत नामदेव पायरीजवळ त्यांनी पूजा केली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
अभिजित पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडावा, सुखसमृद्धी यावी, यांनी व्यक्त केला. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. आगामी काळात पुरेसा पाऊस पडावा, अशी प्रार्थना विठुरायाकडे आज आपण केली.
मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण कर्तव्यभावनेने निश्चितपणे पाठपुरावा करू, प्रामाणिकपणे काम करून आपल्यावर टाकण्यात अभिजित पाटील बोलत होते. आलेल्या विश्वासास पात्र राहून श्री. पाटील आपण चांगल्या पद्धतीने काम करून दाखवू, असा विश्वास श्री. पाटील
श्री. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर आणि मंगळवेढ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवेढा येथे आज सकाळी जेसीबीतून पुष्पवर्षाव करून श्री.पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर तसेच पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात जाऊन शेकडो लोकांनी श्री. पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या.(स्रोत:सकाळ)
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातूनच लढणार
यावेळी पत्रकारांनी पंढरपूर, माढा तसेच पुणे, धाराशिव अशा विविध ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आपले होर्डिंग लावण्यात आले आहेत. नेमके कुठून आपण राजकीय वाटचाल करणार आहात, असा प्रश्न विचारला असता
श्री. पाटील म्हणाले, आपल्यावर प्रेम करणारे कारखान्याचे सभासद, शेतकरी, कामगार, हितचिंतक आणि मित्रपरिवार ठिकठिकाणी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी शुभेच्छापर होर्डिंग लावले असले तरी देशाचे नेते शरद पवार यांनी आपल्याला जी दिशा दाखवली आहे त्या दिशेनेच आपण काम करणार असल्याचे सांगत त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज