टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्याच्या शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी (दि.१८) व मंगळवारी (दि.१९) सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या सर्व शाळा सुरळीतपणे सुरू राहतील,
अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे सचिन जगताप यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भातील पत्र शुक्रवारी रात्री उशिरा काढण्यात आले.
क्षेत्रीय स्तरावर १८ नोव्हेंबर व १९ नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र, शासनाच्या संदर्भ क्रमांक १ मधील पत्रान्वये माध्यमिक विभागाच्या सर्व शाळा १८ व १९ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू राहणार आहेत. तसेच या दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण माध्यमिक विभागाने दिले.
ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही,
अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुटी जाहीर करावी व अशा शाळा वगळता, उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील, असेही जगताप यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज