टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनासाठी मद्यपानाचा उतारा चांगला; डॉक्टरांचा सल्ला पडला महागात शिक्रापूर-सणसवाडी-तळेगाव ढमढेरे याभागात कोरोना रुग्णांची आकडेवारी पन्नाशीत गेली आहे. २२ मार्च पासून या भागात कोरोना रुग्ण टप्प्याटप्प्याने आढळत आहेत. एका वैद्यकीय व्यावसायिकालाही कोरोना संसर्ग झाल्याचेही याभागात सर्वश्रुत आहे. दरम्यान, सोशल डिस्टंसिंगच्या बाबतीत शिक्रापूर पोलिस सजग आहेत हेही सर्वांना ठाऊक आहे. Alcohol extraction is good for corona; Expensive doctor’s advice pune
सणसवाडी-तळेगाव ढमढेरे या भागातील एका जेष्ठ वैद्यकीय व्यावसायिकाने ‘कोरोनासाठी मद्यपान हा चांगला उतारा आहे तो आवर्जून करावा. आखाड आहेच तर त्याचाही लाभ घ्यावा’ असा सल्ला स्पंदन वैद्यकीय संघटनेतील काही जणांना दिला.
या सल्ल्याला अनेकजण बळी पडले आणि शनिवारी (ता.१८) रात्री तळेगाव-ढमढेरे येथील एका फार्महाऊसवर छानपैकी कोरोना-मद्यपार्टी सुरू झाली. पार्टी सुरू होताच एका राजकीय बड्या नेत्याने ही बाब थेट जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या कंट्रोलला कळविली. तातडीने चक्रे फिरली आणि शिक्रापूर पोलिसांचे पथक संबंधित फार्महाऊसवर पोहचताच सर्व डॉक्टरांना रंगेहाथ पकडले. या सर्वांसह दोन फार्महाऊस मालक यांचेवर सोशल डिस्टंसिंगसह जिल्हाधिकाऱ्यांंच्या आदेशाचे उल्लंघन आदी गुन्हे दाखल करण्यात आले.
या सर्वांना लवकरच शिरुर न्यायालयात हजर व्हावे लागणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई आम्ही करणार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. अधिक तपास फौजदार राजेश माळी करीत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज