टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी तिन्ही पक्ष एकत्र लढलो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका,
नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी कामे व्यवस्थित करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
गुरुपौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर विधानसभा अध्यक्ष, माजी नगरसेवक सर्व सेल कार्यकारिणी पदाधिकारी मेळावा केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ते मार्गदर्शनपर बोलत होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य तिथे स्वबळावर लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले.
पुणे-कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची तीन-चार वेळा चौकशी झाली; पण त्यातून काही समोर आले नाही.
त्यामुळे उगाच बदनामी केली जाते. लोकप्रतिनिधी म्हणून मदत करायला लोक फोन करतात तर जावे लागते. माध्यमांपासून सावध राहा.
पुण्याला बदनामी करणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या. त्या सर्वांवर कारवाई केली आहे. अतिक्रमण करून कोण धंदे करणार असेल, तर चालणार नाही. नियमावलीत भेदभाव नाही.
सर्वांना सारखाच न्याय देत आहोत. त्यामुळे बदनामी करू नये. असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
लोकसभेत विरोधकांनी ‘४०० ‘पार झाल्यावर संविधान बदलले जाणार आहे, असा चुकीचा नरेटिव्ह सेट केला. यामुळे एससी, एसटी आदिवासी समाज यांना भीती वाटू लागली. त्यामुळे लोकसभेला फटका बसला. सूर्य-चंद्र आहे तोवर संविधान बदलता येणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज