mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं पण…’,अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली सल; कधी होणार पूर्ण?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 4, 2025
in राजकारण, राज्य
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

महायुतीत सध्या अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत सोबत त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही आहेत. म्हणजेच महत्वाचं अर्थखातं अजित पवाराकडे आहे. मात्र तरीही अधूनमधून त्यांच्या मनाची जुनी इच्छा काही कार्यक्रमात ऐकायला मिळतेच..

मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातही अजित पवारांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छो बोलून दाखवली. काय आहे ती इच्छा? जाणून घेऊया.

जिथे सत्ता तिथे अजितदादा हे समिकरण मागच्या अनेक दशकांपासून कायम राहिलंय. मग सत्ता आघाडीची असो किंवा युतीची… तिथे अजित पवार असणार हे ठरलेलं. अगदी 1990 पासून ते आता 2025 सालापर्यंत फक्त 1995 ते 99 आणि 2014 ते 2019चा अपवाद वगळता अजित पवार कायम सत्तेत राहिलेत.

इतकंच काय त्यांनी आजवर महाराष्ट्राचा सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रमही केलाय. मात्र तरीही अजित पवारांच्या मनात कायम एक सल बोचत राहते.. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांनी ही सल बोलून दाखवली.

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी असं म्हणत असतानाच मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं मात्र कुठं झालो असं म्हणत त्यांनी आपली दुखरी नस बोलून दाखवली. इतकंच नाही तर आपणही एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ असा विश्वासही त्यांनी भाषणात बोलून दाखवला.

अजित पवारांच्या याच विधानावरुन आता जोरदार चर्चा सुरु झाल्यात. यावर त्यांच्याच थोरल्या मित्रपक्षाने टोला लगावलाय. अजित पवार हे कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री आहेतच असं भाजपचे परिणय फुके म्हणालेत.

‘मुख्यमंत्रीपदाची महात्वाकांक्षा कुणीही बाळगू शकतो’

दुसरीकडे भाजपसोबत राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. सोबत त्यांनी त्यावरचा उपायही सांगून टाकलाय. यावर अजित पवारांचे धाकटे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाची छोटीशीच प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.

शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांना अजित पवारांच्या या विच्छेबद्दल विचारल्यावर त्यांनी मोजून चारच शब्दात उत्तर दिलंय. गुलाबरावांनी चिमटा काढला असला तरी मुख्यमंत्रीपदाची महात्वाकांक्षा कुणीही बाळगू शकतो असं म्हणत संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या वक्तव्याची पाठराखण केलीय.

शिंदेंप्रमाणं अजित पवारांसाठीही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न दिवास्वप्न?

सत्ता कुणाचीही आली तरी त्या सत्तेत सहभागी होण्याचं भाग्य आजवर अजित पवारांना लाभलंय. आजवर तब्बल 5 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. सध्याही महायुतीत आमदार संख्येच्या मानाने अर्थखात्यासह महत्त्वाची खाती आपल्या पक्षाकडे ठेवण्यात अजित पवार यशस्वी ठरलेत.

तसंच महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांशी गुळपीठ अधिक असल्याचं दिसतं. तरिही आपण मुख्यमंत्री व्हावं ही अजित पवारांची मनिषा कधी लपून राहिली नाही. मात्र शिंदेंप्रमाणं अजित पवारांसाठीही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न सद्यस्थितीत दिवास्वप्न असल्याचंच दिसतंय.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवार

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026
Next Post
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

पंढरपूर घेणार मोकळा श्वास, कॉरिडॉरसह शहराच्या रुंदीकरण आराखड्याला वेग; जिल्हाधिकाऱ्यांनी 3 दिवस केली नागरिकांशी चर्चा

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..