mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर घेणार मोकळा श्वास, कॉरिडॉरसह शहराच्या रुंदीकरण आराखड्याला वेग; जिल्हाधिकाऱ्यांनी 3 दिवस केली नागरिकांशी चर्चा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 4, 2025
in सोलापूर
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पुढच्या 50 वर्षात येणाऱ्या संभाव्य भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूरशहराच्या विकास आराखड्याला आता वेग आला आहे. कॉरिडॉरच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सलग तीन दिवस बाधित नागरिक व्यापारी आणि वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी यांच्याशी चर्चा केली आहे.

या तीन दिवसात बाधित नागरिकांची कॉरिडॉरबाबत असलेली भूमिका शासनाकडून असलेली अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली आहे. बहुतांश नागरिकांतून याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.

चौफाळा ते महाद्वार घाट या ठिकाणी 100 मीटर रुंदीचा कॉरिडॉर बनवला जाणार

काल जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकांबाबत माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांच्या अपेक्षा नुसार एक पॅकेज बनविण्याचे काम आता सुरू होणार आहे. सर्वांनी याला होकार दिल्यानंतर ते शासनाकडे सादर केले जाईल असे कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

वास्तविक विठ्ठलाच्या दर्शनाला दिवसेंदिवस होणारी गर्दी कमालीची वाढू लागली असून अगदी शनिवार-रविवारी च्या सुट्ट्यात देखील हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. सर्वसाधारणपणे दोन ते अडीच कोटी एवढे भाविक सध्या वर्षाला पंढरपुरात येत असल्याचा अंदाज आहे.

यामुळं मंदिर परिसर व इतर ठिकाणी खूप गर्दीचे चित्र वारंवार समोर येत असते. अशा गर्दीतून शेंद्राचींगरी किंवा इतर दुर्घटना भविष्यात घडू नयेत यासाठी अशा पद्धतीचा विकास आराखडा राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद यांना दिल्या होत्या.

त्यानुसार त्यांनी या कामाला सुरुवात केली असून सध्या चौफाळा ते महाद्वार घाट या ठिकाणी 100 मीटर रुंदीचा कॉरिडॉर बनविला जाणार आहे. या संदर्भातच जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवस बाधित नागरिकांशी चर्चा केली आहे.

बुधवारपासून विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्वेक्षण सुरु होणार

येत्या बुधवारपासून विद्यार्थ्यांच्या मार्फत या बाधित नागरिक व्यापारी यांचे सर्वेक्षण सुरू होणार असून त्यांच्या मार्फत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावलीची उत्तरे सर्व बाधितांनी द्यावीत असे आव्हान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. यातूनच नागरिकांच्या अपेक्षा आणि मागणीनुसार चांगली पॅकेज बनविणे सोपे जाईल असे आशीर्वाद यांनी सांगितले.

कॉरिडॉरच्या बाबतीत लोकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित नागरिकांना दिला आहे. या पॅकेजनंतर नागरिकांशी शेवटची चर्चा होऊन यानंतर भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होईल.

सध्या तरी नागरिकांतून चांगल्या पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शासनाकडून नेमकी किती आर्थिक मदत मिळणार आणि कशा रीतीने पुनर्वसन होणार याकडे बाधित नागरिकांचे लक्ष आहे. याबाबत सकारात्मक भूमिका शासनाकडून आल्यास या कॉरिडॉरमुळे पुढच्या पन्नास वर्षात होणाऱ्या भाविकांच्या संख्येलाही येथे अडचण होणार नाही.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूर कॉरिडॉर

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नकारात्मक बातमी! विजेचा धक्का लागून शिक्षक नेत्याचा मृत्यू; मुलीचे लग्न काही दिवसांवर आल्याने शेतातील कामासाठी काढली होती रजा

December 10, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! बेकायदेशीर वाळू उपशाची माहिती देण्याच्या संशयावरून वकिलावर प्राणघातक हल्ला

December 10, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

December 9, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बाबो..! सोलापूर जिल्ह्यात बँकेची ६ कोटींची फसवणूक; तीन महिलांसह ११ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल; बँकिंग क्षेत्रात खळबळ

December 7, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! प्रसुतीवेळी चुकीच्या गटाचा रक्तपुरवठा झाल्याने महिलेचा मृत्यू; दोन्ही रक्तातील विसंगती न तपासल्यामुळे घडला प्रकार

December 6, 2025
ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

शेतकऱ्यांनो! कोल्हापुरात उसाला 3500 रुपयांचा दर मिळतो मग सोलापुरातच 2800 का? शेतकरी आक्रमक; ‘या’ तारखेपासून आमरण उपोषण

December 4, 2025
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेत मंगळवेढ्याला दुहेरी मुकुट; इंग्लिश स्कूल खेळाडूंच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी; भल्या मोठ्या संघाचा पराभव करत मिळविले विजेतेपद

December 1, 2025
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

खळबळ! माजी आमदारांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती, महायुतीतील शिवसेना-भाजप वाद विकोपाला? सोलापूर जिल्ह्यातील घटना; छाप्यात नेमके काय सापडले?

December 1, 2025
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिका निवडणूक नव्याने जाहीर; असा आहे सुधारित वेळापत्रक; उमेदवारांची धाकधूक वाढली

November 30, 2025
Next Post

कामाची बातमी! शासनाच्या 'आपले सरकार' पोर्टलवर  नागरिकांसाठी उपलब्ध होणार १०२७ ऑनलाइन सेवा; जो विभाग अयशस्वी ठरेल त्याला दरदिवशी भरावा लागेल १००० रुपये दंड

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व कारखान्यांनी कोल्हापूर पध्द्तीने पहिली उचल व संपूर्ण बिलाबाबत घोषणा करावी; उपसरपंच बालाजी गरड

December 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नकारात्मक बातमी! विजेचा धक्का लागून शिक्षक नेत्याचा मृत्यू; मुलीचे लग्न काही दिवसांवर आल्याने शेतातील कामासाठी काढली होती रजा

December 10, 2025
इशारा! खासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास आता पाच पट दंड होणार

महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

December 10, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! बेकायदेशीर वाळू उपशाची माहिती देण्याच्या संशयावरून वकिलावर प्राणघातक हल्ला

December 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

खळबळ! डमी शिक्षक नियुक्तीचा आरोप पूर्णतः फेटाळण्यात आला, मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेतील निर्णयावर शिक्षण विभागाचा निष्कर्ष

December 10, 2025
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खतरनाक चोर! बाहेरगावी गेलेल्या मंगळवेढ्यातील निवृत्त शिक्षकाच्या घरी दीड लाखांची धाडसी घरफोडी; 40 हजार रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

December 9, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा