मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे.
दोन्ही बाजूने सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोण कोण उपस्थित राहते, गैरहजर राहते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांनी स्वत:चा वेगळा स्थापन करून शरद पवार यांना खुले आव्हान दिले आहे. दोन्ही बाजूने सुरू असलेला पॉवर गेम संपूर्ण राज्य अनुभवत आहे.
अशात दोघांनीही राष्ट्रवादी आपलीच म्हणत बैठकांचा धडाका लावला आहे. शरद पवार त्यांच्यासोबत उरलेल्यांच्या बैठकांवर भर देत असून अजित पवारांनी सोबत आलेल्यांना खंबीर राहण्याचे आवाहन केले आहे. एकुणच राजकीय क्षेत्रातील या भुकंपाने आता नवा सामना सुरू झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यजभरात अजित पवारांच्या निर्णयाचे पडसाद उमटून आहेत. त्यांच्यासोबत गेलेल्यांपैकी काहींनी परत शरद पवारांकडे जाऊन निष्ठा दर्शविली आहे. तर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी थेट खासदारकीचा राजनीमा देण्याची तयारी दर्शविली आहे.
प्राजक्त तनपुरे कालपर्यंत मी साहेंबासोबत असे सांगत होते. आता त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही शरद पवार यांच्या फोटोसह मी साहेबांसोबत हा ट्रेंड जोरात आहे. अशात दोन्ही पवारांनी आपापल्या बाजू्च्या लोकांची बैठक बोलाविली आहे.
शरद पवारांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ५ जुलै रोजी बैठक बोलावली असून, अजित पवार गटानेही ५ जुलै रोजीच वांद्रे येथील एमईटी संस्थेत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी यांना बोलावण्यात आले असून,
राज्यभरातून राष्ट्रवादीतील पदाधिकारी उपस्थित राहतील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांनी मला कालच प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्तीचे पत्र दिल्याचे सांगत लवकरच पक्षाच्या अन्य नियुक्त्या केल्या जातील असे त्यांनी सांगितले.
कुणाची बैठक कुठे आणि किती वाजता
शरद पवार – यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई – दुपारी १ वाजता
अजित पवार – स्थळ – एम. ई. टी. भुजबळ नॉलेज सिटी, लीलावती हॉस्पिटल समोर, बांद्रा पश्चिम, मुंबई – सकाळी ११ वाजता
भुजबळ म्हणाले कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आदर करा
आमची शरद पवारांना हात जोडून विनंती आहे बहुसंख्य आमदार, वरिष्ठ नेते, सामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेचा त्यांनी आदर करावा. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहावा, अशी भूमिका पटेल यांनी मांडली. पवार आमचे गुरु आहेत, या कामाला त्यांचा आशीर्वाद असल्याचे भुजबळ म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज