मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
थर्टी फर्स्टचे निमित्त करून दारू पिऊन गावात फिरण्याचा बेत असेल तर सावधान! कारण झिंगाट होऊन गावात फिरणाऱ्या तळीरामांची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय गावातील महिलांनी घेतला आहे.
निघोज, जि. अहिल्यानगर या गावात पूर्णपणे दारूबंदीसाठी गाढवावरून धिंड काढण्याचे पाऊल महिला उचलत आहेत.

२०१६ मध्ये महिलांनी मतदान करून निघोजमधील परवानाधारक दारू दुकाने बंद केली होती. त्यानंतरही गावातील हॉटेल व ढाब्यावर सर्रास अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करत दारूबंदीविरोधी महिला समितीच्या सदस्यांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही दारू विक्री केली जात आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता तळीरामांना जरब बसवण्यासाठी वेगळा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर निघोजमधील दारूबंदी चर्चेचा विषय ठरला आहे.

कोणतीही कारवाई होत नसल्याने महिलांनी आता तळीरामांना अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला.

निघोजमधील दारूबंदीबाबत जनजागृती करण्यासाठी व गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाईसाठी मंगळवारी थर्टी फर्स्टचे निमित्त साधून महिला गावातून फेरी काढणार आहेत.

जिल्हा पोलिस प्रशासनाला तसे निवेदन दिले आहे. पोलिसांकडून मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या जनजागृती फेरीत पोलिसांनीही सहभागी व्हावे, असे साकडे या महिलांनी घातले आहे.

दारूबंदीसाठी महिलांचा ८ वर्षांपासूनचा संघर्ष
निघोज गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या पुढे आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे गावात दारूबंदी व्हावी म्हणून मागील ८ वर्षांपासून महिला संघर्ष करत आहेत. तसा ग्रामसभेत ठराव करून दारूबंदीचा निर्णयही झाला.

पण प्रत्यक्षात छुप्या पद्धतीने गावातील काही हॉटेल व ढाब्यांवर अवैध दारू विक्री होतच आहे. पोलिसही यावर कारवाई करत नसल्याने त्यांनी थर्टी फर्स्टला मद्यपींची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय घेतला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














