टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालय परिसरात निषेध आंदोलन करणाऱ्या 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यापूर्वीच येथील काही स्थानिक रहिवाशांनी कोविड रूग्णांवर उपचार करण्यास विरोध दर्शवत संचारबंदी असताना ही आंदोलन केले होते.
आंदोलनानंतर पंढरपुरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संचारबंदीचा आदेश मोडून आंदोलन करणाऱ्या शालन मच्छिंद्र कोळी, आशाबाई हरिबा रणदिवे, निलावती भिकू कडलास्कर, सुजाता विठ्ठल अंकुशराव, वैशाली संजय डवरी, संगीता पोपट वाघमारे, मिना जगन्नाथ शिनगारे, शोभा आनंद बंगाळे, रेखा अशोक कासार, सविता मोहन माने, बबन धनंजय माळी, विकास दत्तात्रय कोळी, प्रशांत प्रभाकर लोंढे,माया दत्तात्रय कोळी, स्वाती युवराज माने, भाग्यश्री सोमनाथ माने, ज्योती समीर मगर, रोहिणी गणेश कोळी, जया धर्मा तावस्कर,नंदा विलास परचंडे, सुनिता धनंजय माळी आदींसह 60 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण पवार यांनी दिली.
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यापूर्वीच येथील काही स्थानिक रहिवाशांनी कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यास विरोध दर्शवत संचारबंदी असताना ही आंदोलन केले होते.
Pandharpur Agitation against treatment of corona sufferers Crimes filed against 60 people
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज