टीम मंगळवेढा टाईम्स।
आठ वर्षांच्या मुलाने खेळत असताना बाहुलीला फाशी दिली. त्यानंतर स्वत : देखील गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या मुलाला मोबाईलवर हॉरर चित्रफिती पाहण्याची सवय होती. त्यातून त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कमल खेम साऊद (वय ८ , रा . १६ नंबर बसस्टॉप, थेरगाव ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कमल आणि त्याचा लहान भाऊ आणि बहीण हे खेळत होते. त्यावेळी कमल याने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली.
बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर , कमल याने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वत : ही गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . त्यावेळी कमल मोबाईलमध्ये हॉरर फिल्म पाहत असल्याचे समोर आले.(स्रोत:लोकमत)
अन् आईने फोडला हंबरडा
कमल याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच खोलीमध्ये धाव घेतली. कमल अशी थट्टा करू नको म्हणून आईने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कमलला अशा अवस्थेत पाहून आईने हंबरडा फोडला.
मोबाइल सोडून अभ्यासाकडे लक्ष दे म्हटल्याने आत्महत्या
नववीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी समजावून सांगितले. मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष दे, असे ते म्हणाले. त्याचा राग आल्याने मुलाने बाथरूममध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काळे कॉलनी , देहू फाटा , आळंदी देवाची येथे रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली . बद्रीनाथ विष्णू राठोड ( १६ ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज