mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलांनो! लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना; उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय? हेल्पलाइन नंबर जारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 18, 2025
in राज्य
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

गेल्या काही महिन्यांपासून घरगुती हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

राज्यात ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात, त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ठाण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडकी सून योजना सुरु करत असल्याचे जाहीर केले. ज्याप्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते, अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे,

या उद्देशाने शिवसेनेकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये केवळ पीडित सुनांनाच नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे, जेणेकरून समाजात एक सकारात्मक संदेश जाईल.

हेल्पलाइन नंबर जारी

या मोहिमेअंतर्गत, घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. 8828862288 असा हा हेल्पलाईन नंबर असणार आहे. या मोहिमेत शिवसेना शाखा आणि कार्यालयेही सहभागी होणार आहे.

तसेच पीडित महिलांना तातडीने मदत पुरवली जाईल. यावेळी एकनाथ शिंदेंनी या योजनेबद्दल आपले मत व्यक्त केले. “जशी आपली मुलगी असते, तशीच सूनही असते. तिलाही सन्मानाने वागवले पाहिजे.

अनेक घरांमध्ये सुनांवर अत्याचार होतात, त्यांना त्रास दिला जातो. याला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे. ज्या सुनांना मदत हवी असेल, त्यांनी न घाबरता या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.” असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

राज्यभर मोहीम राबवली जाणार

सुरुवातीला समुपदेशनाद्वारे कुटुंबामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ही पद्धत अयशस्वी ठरली, तर मग आपली शिवसेना स्टाईल आहेच. या योजनेत केवळ अन्याय झालेल्या सुनांनाच नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेची राज्यस्तरावरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून, प्रत्येक शिवसेना शाखेतून पीडित महिलांना मदत केली जाईल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लाडकी सुनबाई योजना

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 11, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 11, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 10, 2026
Next Post
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! वैद्यकीय पदवी नसताना उपचार; दोन बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल; तालुका आरोग्य विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा