टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंत्यविधी आटोपल्यानंतर मृत महिला ही कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने त्या महिलेचे कुटुंबीय,नातेवाईक व अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापुरातील एका परिसरातील ७५ वर्षीय महिलेचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचा अंत्यविधी करण्यात आला.अंत्यविधी करून आल्यानंतर मृत पावलेली ती महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अंत्यविधीला गेलेल्या नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्या महिलेला १२ दिवसांपूर्वी मधुमेहाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान , त्या महिलेचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. परंतु त्याचा अहवाल अद्याप आला नव्हता. उपचारादरम्यान त्या महिलेचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. कोरोना चाचणीचा अहवाल आला नसताना रुग्णालयाने महिलेचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन टाकला. त्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत त्या मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने सगळेच चक्रावून गेले. सोलापूर शहरातील त्या नामांकित रुग्णालयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेतलेला असताना तिचा मृतदेह नातेवाइकांकडे दिलाच कसा ? सोलापुरातील त्या नामांकित रुग्णालयाने हलगर्जीपणा केला असून त्यांच्या हलगर्जीपणाचा मनस्ताप आता नागरिकांना सोसावा लागण्याची शक्यता आहे.
मृत महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने महिलेच्या कुटुंबातील सदस्य , शेजारील नागरिक अशा सोळाजणांना क्वारंटाइन केले आहे. कोरोनाच्या पुढील चाचणीसाठी त्यांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले असून संपर्कात आलेल्या उर्वरित व्यक्तींचाही शोध सुरू आहे.
After the funeral it was understood that the dead woman was coroned solapur
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज