टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व तालुक्यातील छोट्या मोठ्या उद्योगांना चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अजित रामचंद्र जगताप यांच्या संकल्पनेतून समृद्धी येता दारी, लक्ष्मी नांदे आपल्या घरी हे ब्रीदवाक्य घेऊन
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होत असलेल्या समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा उदघाटन समारंभ आज रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता सीमाताई प्रशांत परिचारक यांच्या हस्ते, मधुमती – दिपक आबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
तर प्रा.शोभा काळुंगे, डॉ.प्रणिता भालके, शैलजा सावंत, भारती पाटील, अश्विनी शहा, अर्चना खरात, आशा नागणे, निला आटकळे, प्रा. तेजस्विनी कदम, मनिषा जाधव, शुभदा पटवर्धन, निर्मला माळी, अर्चना नितीन इंगवले, हर्षदा सुरवसे,
विजया देशमुख, श्रद्धा पवार, प्रा. धनश्री कापशीकर, अर्चना अनिल यांच्या संकल्पनेतून समृद्धी येता इंगवले, आरती पुजारी, जयश्री हावनाळे, अरूणा दत्तू, अरूणा माळी, लक्ष्मीबाई वाकडे, साहेरा काझी, शितल बुरकूल, अपर्णा हजारे आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पतसंस्थेच्या शुभारंभानिमीत्त आज सायंकाळी ६:३० वाजता मारूतीच्या पटांगणात सुप्रसिद्ध व्याख्यात्या प्रा.डॉ प्रिती शिंदे, कोल्हापूर यांचे शक्तीचे नावच नारी आहे. या विषयावरती व्याख्यान संपन्न होणार आहे.
आज सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत असे चहापानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पतसंस्थेच्या माध्यमातून यशोधन मासिक योजना, वर्तमान पेन्शन ठेव योजना, कन्यादान ठेव योजना, दाम दुप्पट ठेव योजना अशा योजनांवरती आकर्षक व्याज दरासह विश्वासाहर्ता जपली जाणार आहे.
तसेच सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करून उदघाटन व व्याख्यानासाठी उपस्थित रहावे आवाहन पतसंस्थेच्या चेअरमन आशादेवी रामचंद्र जगताप व संचालक मंडळाने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज