मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना व्हायरस मागील महिनाभरापासून सोलापुरात धुमाकूळ घालत आहे. शहरात कमी कालावधीत जास्त रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनावर मोठा ताण आला आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचे दवाखाने सुरू ठेवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या अन्य आजारांवरच्या रुग्णांचा भार कमी करण्यासाठी मदत करावी. अन्यथा खासगी दवाखाने आणि डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या आजूबाजूच्या कन्टेमेंट झोन येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या निमा संघटनेची बैठक झाली. निमा संघटनेतील 10 डॉक्टर या कन्टेमेंट झोन येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जास्त डॉक्टरांची गरज असल्याने आयएमए संघटनेतील खासगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात रुग्णांचे सर्वेक्षण प्रभावी होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची 10 पथके कार्यान्वित केली आहेत.
200 सर्व्हे किट्स व 400 थर्मामीटर उपलब्ध केले आहेत. सोलापूर शहरात व जिल्ह्यात काम करण्यासाठी आलेले परप्रांतीय अडकले आहेत; मात्र यांची संख्या विषेश रेल्वेने पाठविण्यासारखी नसल्याने त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी पुणे व औरंगाबाद प्रशासनाशी चर्चा करून रेल्वे निश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लॉकडाउन असल्याने अन्य राज्यांतून येणार किरणा माल येत नसल्याने काही किराणा दुकानदार चढ्या दराने माल विक्री करत आहेत. त्याबाबत अन्न व औषध विभागच्या वतीने अशा किराणा दुकादारांवर करडी नजर ठेवून त्यांच्या कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर ही कारवाई करण्याचे संकेत श्री. शंभरकर यांनी दिले.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज