टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद हु. येथील आरोपी गणेश नरळे याची अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमीष दाखवून फुस लावून
पळवून नेवून बलात्कार केल्याप्रकरणी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री.तोष्णीवाल सो यांनी जामीनावर मुक्तता केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.४ फेब्रुवारी २०२३ रोजी गणेश पुतळाप्पा नरळे याने हुन्नुर येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमीष दाखवून फुस लावून पळवून नेवून तिचेवर बलात्कार केल्याबाबत
मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे भा. द.वी. १८६० चे कलम ३६३, ३६६ – अ, ३७६ (२) (द), ३४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२, ४२ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.
सदर प्रकरणातील आरोपी हा फिर्यादीचे घरी जात येत होता. त्याचे व फिर्यादीचे ओळखीचे संबंध होते. आरोपी हा वेळोवेळी मुलीस शाळेत सोडावयास जात येत होता. त्यामुळे मुलगी व आरोपी हे एकमेकांचे संपर्कात आहेत.
याची माहिती फिर्यादीचे कुटुंबास होती. त्यामुळे यातील आरोपी हा दोषी नाही, यातील फिर्यादीने यापुर्वी दोघांचे संपर्काबद्दल कधीही माहिती दिलेली नाही अथवा त्यांचेमध्ये भांडणतंटा झालेला नाही.
तसेच आरोपी हा व्यापारी व व्यवसायीक असुन त्याचेकडून आर्थिक लाभ घेण्याकरीता सदरची खोटी फिर्याद दाखल केलेली आहे असा केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. तोष्णीवाल सो यांनी जामीनावर मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणी यातील आरोपीतर्फे अॅड. एम. डी. गायकवाड यांनी काम पाहिले व सरकार तर्फे अॅड. वांगीकर यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज