टीम मंगळवेढा टाईम्स ।
९७ व्या घटना दुरुस्तीनुसार १९ हजार सभासदांना नोटिसा देणे बंधनकारक होते. त्यावेळी राज्य सरकार विरोधात होते. कारखाना प्रशासनावर कारवाईची टांगती तलवार होती.
मात्र आम्ही नोटीस रद्द कशा करायच्या याबाबत ज्येष्ठ वकिलांशी चर्चा केली. याबाबत साखर आयुक्तांना अहवाल पाठवला व १९ हजार सभासद आपात्रतेचा निर्णय रद्द झाला.
मात्र याबाबत विरोधकांनी अपात्रतेबाबत खोटे भांडवल केले असल्याचा आरोप आमदार समाधान आवताडे यांनी केला मंगळवेढा येथे आवताडे पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते बबनराव आवताडे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, प्रा . येताळा भगत , शशिकांत चव्हाण अंबादास कुळकर्णी , प्रदीप खांडेकर , भारत निकम , राजेंद्र सुरवसे , राजन पाटील , पांडुरंग जावळे , अशोक केदार विजय माने , सचिन शिवशरण , सुरेश भाकरे , विनायक यादव , सचिन चौगुले सुरेश कांबळे , बापू मेटकरी , सुदर्शन यादव आदी उपस्थित होते.
आ.आवताडे पुढे म्हणाले, समविचारी पॅनलमध्ये अविचारी लोक एकत्र आले आहेत. राजकीय उचली घेऊन बाजारात जाऊन आपले दुकान थाटायची ही समविचारीची पद्धत आहे.
उमेदवार नसलेले काही जण खोटे प्रचार करत आहेत. कारखान्याच्या माध्यमातून विवाह सोहळा घेऊन लाखो रुपयांची उधळपट्टी केली.
भाजपचे संघटक शशिकांत चव्हाण म्हणाले, भालके व परिचारक गट संपवला ते ज्यांनी आवताडेच्या विरोधात उभे आहेत.
अशा लोकांना सभासद नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील असा विश्वास शशिकांत चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज