टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर, कुस्ती मैदान, वृक्षारोपण, महाआरोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर आदी विविध सामाजिक कार्यक्रम होणार आहेत.
अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता श्री संत नामदेव पायरी येथे महाआरती करण्यात येणार आहे.
नंतर ते टेंभुर्णी, अरण, माढा, मंगळवेढा दौरा करणार असून सायंकाळी पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अभिजीत पाटील प्रेमी मंडळाच्या वतीने देण्यात आली.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, धाराशिव कारखाना, सांगोला कारखाना यासह अनेक साखर कारखाने यशस्वीरित्या चालवून पाटील यांनी हजारो शेतकऱ्यांशी संपर्क ठेवला आहे.
आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यशस्वीरित्या सुरू करून श्री. पाटील यांनी विक्रमी गळीत करत सर्वाधिक दर देण्याची स्पर्धा निर्माण केली आहे. नुकतीच श्री विठ्ठल कारखान्यास शासनाने ३४७ कोटी रुपये थकहमी मंजूर केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा वाढला आहे.
सकाळी पंढरपुरातील महाआरतीनंतर साडे नऊ वाजता टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता अरण येथे जाऊन ते संत सावतामाळी मंदिरात दर्शन घेऊन अकरा वाजता माढा येथील माढेश्वरी मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.
दुपारी दोन वाजता गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून
दुपारी चार वाजता मंगळवेढा येथील संत दामाजी मंदिर, जयभवानी मंदिर, संत चोखामेळा समाधी, पीरसाहेब येथे दर्शन घेऊन सायंकाळी सात वाजता श्री. पाटील हे पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
पाच हजार वृक्षारोपण
■ श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संचालक मंडळाने १० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता. आतापर्यंत पाच हजार झाडे लावण्यात आली. या कामासाठी वनविभाग पंढरपूर यांचे सहकार्य मिळत असून उर्वरित पाच हजार झाडे १५ ऑगस्टपर्यंत लावण्यात येणार आहेत.
कारखान्यावर रक्तदान शिबिर
कारखाना साईटवर सकाळी नऊ वाजता डॉ. निशिगंधा माळी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा प्रारंभ होणार असून दुपारी श्री. पाटील यांचा सत्कार केला जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता वन परिक्षेत्र अधिकारी चैताली मनिष झरांडे, ज्योती कुलकर्णी, उपाध्यक्षा प्रेमलता रोंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
शनिवारी ३ ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल प्रशाला वेणुनगर येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गणवेष वाटप, साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता श्री नागनाथ विद्यालय मूकबधिर शाळा, बाभुळगाव विविध कार्यक्रम होणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज