पंढरपूर : राजेंद्र फुगारे
भारत कृषी आणि सहकार प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेती व सहकार माध्यमातून देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील एक युवा उद्योजक ज्यांनी अल्पवधीन काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये उंच गरुड भरारी घेतली.
कोणाच्या दुसऱ्या लाटे मध्ये प्रकल्प बंद करून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशावरून आपल्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करून लाखो जणांना जीवदान दिले.
बारा वर्षे बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना अवघ्या ३५ दिवसात सुरू करून आपल्या कामाची चुणूक दाखवली तसेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना तीन वर्ष बंद अवस्थेत असताना
उत्कृष्ट नियोजन व कामाची सचोटी लावून यशस्वी गाळप केले याच अनुषंगाने चेअरमन अध्यक्ष अभिजीत पाटील यांना दैनिक नवराष्ट्रने आदर्श चेअरमन पुरस्कार म्हणून घोषित केले आहे.
मुंबई येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे दिनांक १२ऑक्टोबर रोजी दैनिक नवराष्ट्र समूह तर्फे आदर्श चेअरमन म्हणून अभिजीत पाटील यांना राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
“नवराष्ट्र कोऑपरेटिव्ह अवॉर्ड २०२३” हा सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार स्वीकारताना आठवत झाली ती श्री विठ्ठल कारखान्याची निवडणूकीची आणि सभासदांनी दाखवलेला विश्वासाची त्याच विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी श्री.अभिजीत पाटील कायम प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.
पुरस्कार रूपाने या प्रामाणिक कार्याला समाज मान्यता मिळण्याचा आनंद आहेच.. पण त्याचे श्रेय सर्वस्वी सभासदांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला आहे. हा विश्वास वाढता रहावा यासाठी यापुढेही अविरत परिश्रम सुरूच राहतील असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना बोलले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज