टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यातील 35 गावच्या उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या मागण्यांसाठी श्री विठ्ठल सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना भेटून उपसा सिंचन तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली तसेच मंगळवेढातील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी निधी मागणीचे निवेदन ही दिले आहे.
अर्थमंत्री या नात्याने भरघोस निधी मंजूर करा
मंगळवेढातील ३५ गावांपैकी २४ गावांची उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असून उर्वरित गावे तांत्रिक बाबींमुळे शासनाच्या लाल फितीत अडकल्या असल्याने उपसा सिंचन योजनातील त्रुटी पूर्ण करून अर्थमंत्री या नात्याने उपसा सिंचन योजनेसाठी भरघोस निधी मंजूर करावा अशी मागणी अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे केली.
स्व.भारतनाना भालके यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची विनंती
तसेच स्व.आमदार भारतनाना भालके यांनी उपसा सिंचन योजनेसाठी प्रयत्न केले होते. ही योजना मार्गी लावून स्व.भारतनाना भालके यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची विनंती अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली.
मंगळवेढ्यात ३१ वर्ष महात्मा बसवेश्वरांचे वास्तव
तसेच मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा बसवेश्वर हे समस्त महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वसामान्यांचे व लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान आहेत.
त्वरित निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करा
मंगळवेढा येथे ३१ वर्ष महात्मा बसवेश्वरांचे वास्तव असून मंगळवेढा भूमी पावन आहे. महात्मा बसवेश्वर स्मारकांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात स्मारकाची घोषणा झाली असून अद्याप स्मारकास निधी उपलब्ध झालेला नाही. तरी त्वरित निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामास सुरुवात व्हावी, अशी देखील मागणी केली आहे.
यावेळी गेले अनेक वर्ष पाणी प्रश्नांसाठी अविरत लढा देणारे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग चौगुले, सरपंच अर्जुन खांडेकर, भिमराव मोरे, पांडुरंग जावळे आदिजण उपस्थित होते.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज