पंढरपूर : प्रतिनिधी
पाणी टंचाई बरोबरच वीज कपातीच्या संकटामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. असे असतानाही शासन स्तरावरून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने श्री विठ्ठल परिवार तसेच विविध पक्ष, संघटनांच्यावतीने आज सोमवारी सकाळी ९ वाजता
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तहसील कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा ‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
दुष्काळ जाहीर करावा, उजनीतून नदी व कालव्यांना पाणी सोडावे, सोनके तलाव भरून घ्यावा, चारा डेपो सुरू करावेत, दुधाला विनाकपात ३८ रूपये दर द्यावा,
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, जालना जिल्ह्यातील लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी,
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज