टीम मंगळवेढा टाईम्स ।
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्ज वसुली साठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फसवणूक गुन्हा प्रकरणी
कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह उपाध्यक्ष प्रेमलता रोंगे व इतर १८ संचालकांना मंगळवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम बी लंबे यांनी जमीन मंजूर केला आहे.
राज्य सहकारी बँकेने विठ्ठल साखर कारखान्यास मागणीनुसार वेळोवेळी कर्ज दिलेले होते. मात्र बँकेने ठरवून दिलेल्या टॅगिंग प्रमाणे ५३ कोटीपेक्षा जास्त रक्कम न भरता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळांनी संगणमताने बँकेस आर्थिक नुकसान पोहोचविण्याचा आरोप ठेवत
अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ आविरुद्ध फसवणूक व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे लेखी तक्रार बँकेचे प्रादेशिक अधिकारी कैलास घनवट यांनी दिनांक १२ जानेवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात केली होती.
त्यानंतर अभिजित पाटील यांनी ७२ तासांसाठी अंतरिम आटकपूर्व जमीन मिळवण्यात यश मिळवले होते. मात्र इतर संचालकाना अटक होण्याची भीती होती.
याबबत मंगळवारी न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. अध्यक्ष अभिजीत पाटील व सर्व संचालक यांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर चव्हाण यांच्यामार्फत येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
त्यावर सुनावणी अभिजीत पाटील, प्रेमलता रोंगे व इतर संचालक यांचा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज