पंढरपूर । राजेंद्र फुगारे
राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील आता ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
सोनके तलाव लवकरात लवकर भरून घ्यावा यासाठी जलसंपदा विभाग पंढरपूर येथील अधिकारी यांना राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित निवेदन दिले.
माझा बळीराजा शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या शेतात सोनं पिकवतो आणि पाण्यावाचून पिकं डोळ्यासमोर जळून जातात.त्यामुळं निरा भाटघर कालव्यातून सोनके तलाव भरुन मिळावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल,शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते रणजीत बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक नेते सचिन आटकळे, पिराजी कुरोलीचे माजी सरपंच कुलदीप कोलगे, समर्थ साठे यांसह आदी उपस्थित होते.
सोलापुरात नववीतील मुलाने संपवलं स्वत:चं जीवन; कारण अद्याप अस्पष्ट
नववीमध्ये शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. निशांत व्हनप्पा हुल्ले (वय १४, रा. भारत नगर कुमठा नाका) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली.
निशांत हा नववीचे शिक्षण घेत होता. गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निशांत याने आपल्या खोलीतील अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. खूप वेळ होऊनही निशांत हा खाली न आल्याने आई त्याला पाहण्यासाठी त्याच्या खोलीत गेली. तेव्हा निशांत हा लटकलेला दिसला.
दरम्यान, तेथे आलेले निशांतचे वडील यांनी लगेच निशांतला खाली उतरवून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पण तोवर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली. निशांतच्या पश्चात आई, वडिल, दाेन भाऊ असा परिवार आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज