टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य पर्यटन विभागाअंतर्गत कृष्ण तलाव सुशोभिकरणासाठी 2 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडील मोहिमेसाठी मंगळवेढ्यापासून कोसभर अंतरावर असणाऱ्या कृष्ण तलावालगत शिवाजी महाराजांसह सैन्याचा पदस्पर्श लाभला.
ऐतिहासिक परिसर दुर्लक्षित असून, या ठिकाणी शासनाने लक्ष दिल्यास एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. त्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे. वृत्त दैनिक सकाळने 21 मार्च 2021 च्या अंकात प्रसिद्ध केले होते.
इतिहासामध्ये कलचुरी राजवट व यादव काळापासून मंगळवेढ्याचे ऐतिहासिक महत्त्व असून आदिलशाही साम्राज्याचे मंगळवेढा प्रवेशद्वार होते.
मिर्झाराजे जयसिंगांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह झाल्यानंतर फलटण – खटावमार्गे मंगळवेढ्याकडे येत असताना महाराजांनी नेताजी पालकरांना मंगळवेढा किल्ला ताब्यात घेण्यासाठी पुढे पाठवले.
मागे असलेल्या शिवाजी महाराजांनी सोबतच्या घोडदळ व पायदळाबरोबर कोसभर अंतरावर असलेल्या कृष्ण तलावावर पाण्याची सोय व सुरक्षित ठिकाण असल्याने ते थांबल्याचे काही इतिहासकारांनी पुस्तकात नमूद केले. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवार मोहिमेत या तलावात कृष्णाचे मंदिर आढळून आले.
जुन्या काळातील काही मूर्ती सापडल्या त्या मूर्ती काही संशोधकांनी इतरत्र नेल्या तर काही पालिकेत ठेवल्या. तलावामधील गाळ काढल्यामुळे शहरालगतच्या विंधन विहिरींना पाणी साठा वाढला.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये नागरिकांच्या व दामाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेवाच्या विद्यार्थांच्या माध्यमातून 103 विविध प्रकारची 4700 वृक्षांची लागवड केली.
सध्या ही झाडे सुकून गेली.लोकसहभागातून केलेले अनेक उपक्रम वाया गेले. जि.प. उपाध्यक्ष तालुक्यातील असताना परिसर सुशोभीकरणासाठी निधी मिळावा अशी मागणी केली.जि.प.ने निधी दिला नाही.
समाधान आवताडे यांनी प्रयत्न करून या परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी मिळवला, या निधीतून अंतर्गत येथे खडीकरण व डांबरीकरण करणे, तारेचे कुंपण करणे,पेव्हिंग ब्लॉक बसवणे,
वृक्षारोपण करणे, बैठक व्यवस्था करणे, नाला बांधकाम करणे,व विद्युतीकरण करणे. ही कामे करण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील कृष्ण तलाव साठी नगरपालिकेला निधी खर्चासाठी मर्यादा येतात. म्हणून राज्य सरकारने निधी मंजूर केला तलावापर्यंत रस्ता व संरक्षक भिंत,
तसेच विशेष निधीची तरतूद झाल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील व मंगळवेढ्याचा ऐतिहासिक वारसा इतरांना माहिती होण्याच्या दृष्टीने आ. अवताडे यांनी केले प्रयत्न हे निश्चित कौतुकास्पद ठरले.- सुहास पवार, चोखामेळानगर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज