टीम मंगळवेढा टाईम्स।
जेवण करुन फिरण्यासाठी मंगळवेढा-पंढरपूर रोड वर पायी चालत गेल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या एका मोटर सायकलस्वाराने तानाजी रामचंद्र गवळी (वय ३४) याला जोराची धडक देवून गंभीर जखमी केल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार गणपती लक्ष्मण कांबळे (रा.तुळजापूर,जि. उस्मानाबाद) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी रामचंद्र गवळी यांचा जखमी मुलगा तानाजी गवळी हा रोजी रात्री १०.३० वाजता जेवण करुन नेहमी प्रमाणे फिरण्यासाठी गेला होता.
त्याचा मित्र जावेद नदाफ यांनी १०.४५ वाजता फोन करुन फिर्यादीस सांगितले की, मंगळवेढा-पंढरपूर रोडवर बिर्याणी हाऊसच्या समोर मोटर सायकल क्रमांक एम.एच.२५ ए.क्यू – ६७९० चा चालक
गणपती लक्ष्मण कांबळे याने भरधाव वेगात येवून धडक दिल्याने तुमचा मुलगा गंभीर जखमी झाला असून मोटर सायकलस्वार पळून गेला आहे.
अपघात घडल्यानंतर तानाजी हा शुध्दीवर नव्हता त्याला उपचारासाठी प्रथम ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा व तद्नंतर सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमध्ये रेफर केले.
दोन दिवस उपचार घेतला व मुलगा शुध्दीवर आला नाही. म्हणून दि. ३ मार्च रोजी गंगामाई हॉस्पिटल येथे घेवून गेले.
अजूनही तो बेशुध्द अवस्थेत असल्याने तक्रार देण्यास येता न आल्याने उशीर झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज