टीम मंगळवेढा टाईम्स।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये आज सभा होणार आहे. या सभेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. ही सभा कोकणातील रेकॉर्ड ब्रेक सभा असेल असं सांगितलं जात आहे.
खेड येथील गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. संध्याकाळी ही सभा होणार आहे. विशेष म्हणजे 5 मार्च रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. त्याच मैदानातून आज एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विशेष म्हणजे, या सभेची प्रचंड वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ, अशी रामदास कदम यांची पोस्टर्स लावण्यात आली आहे. त्यामुळे रामदास कदम यांची तोफही आज कोकणात धडाडताना दिसणार आहे.
गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर याच मैदानात शिवसेनेची उत्तर सभा काही तासाने सुरू होणार आहे. सभेला गर्दी वाढवण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे. सभास्थळाचं वातावरण भगवमय झालं आहे. गोळीबार मैदान खुर्च्यांनी फुलले आहे. खेडमध्ये लोकांची मोठी गर्दी दिसत आहेत. सभेसाठी ही लोकं आल्याचं सांगितलं जात आहे. कोकणातील सर्वच खेड्यातून या सभेसाठी माणसं आणली जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी या सभेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांची सभा ही काय कोणावर टीका करण्यासाठी होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणाचा विकास आराखडा लोकांना सांगणार आहेत. कोकणाला दिशा देणारी ही सभा होणार आहे. ही ऐतिहासिक अशी सभा होणार आहे. सभेची वातावरण निर्मिती झाली आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं. भास्कर जाधव यांना टीका केल्याशिवाय काही काम उरलेले नाही. आपण उद्धव ठाकरेंचे खूप जवळचे कसे आहोत हे दाखवून देण्याकरता ते सातत्याने टीका करत असतात, असा टोला त्यांनी लगावला.
सकाळी साडे नऊ वाजल्या पासून आम्हाला विरोधक शिव्या देतात. जनता त्यांना निवडणुकीत जागा दाखवले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाला मानतो, असंही त्यांनी सांगितलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज