मंगळवेढा टाईम्स न्युज । संपादक – समाधान फुगारे (7588214814)
व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम हे खूप लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे स्कॅमर्स त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता व्हिडिओ कॉल करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जर वापरकर्ता स्कॅमरच्या जाळ्यात अडकला तर त्याचंही खूप नुकसान होतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबर किंवा व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल येत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
आजकाल सायबर ठग लोकांकडून लैंगिक ब्लॅकमेलिंग म्हणजेच सेक्सटॉर्शनद्वारे पैसे उकळत आहेत. मंगळवेढा परिसरात सायबर भामट्यांनी एका तरुणाला लैंगिक शोषणाचा शिकार बनवले. आरोपींनी तरुणाला सेक्सटोर्शन करून ब्लॅकमेल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.
मंगळवेढा शहर परिसरात एका तरुण मुलाला ऑनलाईन व्हिडीओ कॉल बाहेरच्या राज्यातील एका महिलेने करुन त्याला बाथरुम मध्ये जावून नेकेड होवून
व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला देवून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडल्याने त्या तरुणास मानसिक धक्का बसून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
दरम्यान बाहेरच्या राज्यातील असे व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला कोणी दिल्यास त्यास बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या घटनेची हकीकत अशी, मंगळवेढा परिसरातील एका तरुणाला दि.३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता फेसबुकवर ऑनलाईन नंबरवरुन त्याला व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला दिला.
सदर महिलेने बाथरुम मध्ये जावून नग्न होवून व्हिडीओ कॉल करावयास सांगितले. मुलाने त्या महिलेचे ऐकून नग्न होवून व्हिडीओ कॉल केला. दरम्यान हे कृत्य सदर महिलेने रेकॉर्डीग करुन त्या तरुणास पैशाची मागणी केली.
अन्यथा तुझ्या नातेवाईकांना हा व्हिडीओ कॉल पाठवून बेइज्जत करण्याचा इशारा दिला. हा मानसिक धक्का त्याला सहन न झाल्याने त्या मुलाने चक्क एका विहिरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला.
घरच्यांनी सदर मुलाची वाट पाहून तो न आल्याने पोलीसात मिसींग दाखल केली होती. आत्महत्येनंतर तीन चार दिवसांनी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगल्याने ही घटना उघड झाली.
सध्या व्हॉटसअप, फेसबुकचा जमाना असून प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल दिसून येत आहे. बाहेरच्या राज्यातील स्त्रिया मुलांना आकर्षीत करण्यासाठी असे व्हिडीओ कॉल करुन पैशाची मागणी करतात.
पैसे न दिल्यास पोलीसात तक्रार करण्याची व बदनामी करण्याची धमकी देतात. याला तरुणांनी बळी न पडता अशी धमकी मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
महिलेने धमकी देण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क करा
फेसबुकवर बाहेरच्या राज्यातील महिलांचे कॉल येत असतात. त्याला प्रतिसाद न देता तरुणांनी दक्ष रहावे. चुकून एखादया महिलेने धमकी देण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. – महेश ढवाण पोलीस निरीक्षक, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज