टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा बसस्थानकासमोरील एका हॉटेलसमोर गाडीवर हिरोसारखा बसलेल्या अवस्थेत पोलिसांनी एका अट्टल चोरट्यास सापळा लावून पकडला. या कारवाईत त्याच्याकडून सहा मोटारसायकली जप्त केल्या असून अन्य चार गाड्यांचा शोध ग्रामीण पोलिस घेत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
दुचाकीचोरीच्या गुन्हयाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत दुचाकीचोराला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
राहूल प्रवीण माने (रा.चिचुंबे, मंगळवेढा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
फिर्यादी बाळू सुरवसे यांची होंडा कंपनीची शाईन दुचाकी (एम.एच-१३ सी. झेड ८९२०) ही मंगळवेढा शहरातील एकाने चोरली असून, तो बसस्थानक परिसरातील हॉटेलजवळ थांबला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकाला मिळाली होती.
त्यावेळी सापळा लावून माने याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आणखी ५ दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. या दुचाकी त्याच्या राहत्या घराच्या मागील बाजूला असणाऱ्या पत्रा शेडमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले.
या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्या मालकांचा शोध घेणे सुरू आहे. माने याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज