टीम मंगळवेढा टाईम्स ।
एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने प्राथमिक शिक्षकाच्या एटीएम कार्डची आदलाबदल करून 1 लाख 51 हजाराची रक्कम बॅक खात्यातून काढून फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची फिर्याद नवनाथ शहाजी सपताळे (वय-52 रा.सप्तश्रृंगीनगर, ढवळस रोड, मंगळवेढा) यांनी दिली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पगार खाते भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा येथे असून दि. 22 फेब्रुवारी रोजी घराचे बांधकामासाठी नोकरीच्या फंडातील 3 लाख 75 हजार 000/- रुपये जमा झाले.
दि.25 फेब्रुवारी रोजी 3 हजार 200/-रू, 15 हजार वर्ग केल्यानंतर दुपारी 12.40 वा. फिर्यादीने मित्राचे हात ऊसने पैसे देण्यासाठी सदर खात्याचे ए.टी.एम. कार्ड घेऊन
बँक ऑफ इंडियाच्या मंगळवेढ्यातील ए.टी.एम मध्ये गेल्यानंतर रिमोव्ह टू कार्ड असा संदेश ए.टी.एम. मशीनने दिल्याने ए.टी.एम. कार्ड काढून हातात ठेवले.
त्यावेळी ए.टी.एम. रूमच्या रांगेतील पाठीमागील अंदाजे 30 ते 35 वयोगटातील इसमाने फिर्यादीला तुमचे ए.टी.एम. मला द्या मी पैसे काढून देतो असे म्हणाला, फिर्यादीने ए.टी.एम. कार्ड त्यास दिले.
त्यांचेसमोर ए.टी.एमचा पिन नंबर टाकत असताना त्यांने मला न कळत माझा पिन नंबर माहित करून घेतला व ए.टी.एम मशीनमधून पैसे निघत नाहीत असे कारण सांगून ए.टी.एम. बाहेर काढले.
व त्यावेळी त्याने हातचलाखी करून महेश महासागर यांच्या नावे असलेले एस.बी.आय बँकेचे ए.टी.एम. कार्ड त्यांचा सिरीयल नंबर 544670007816 5137 हे ए.टी.एम फिर्यादीने स्वताचे समजून घरी आणले. त्याचवेळी दुपारी 01/58वा. 20 हजार काढल्याचा संदेश आला.
दुसऱ्या दिवशी खात्यावर 1 लाख 81हजार 896 रू. शिल्लक होते. फिर्यादीच्या खात्यातून 1 लाख 51 हजार कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर अज्ञात इसमाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज