mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऑनलाईन खरेदी करताय, सावधान; 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 12, 2022
in मनोरंजन, राष्ट्रीय
सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

टीम मंगळवेढा टाईम्स। 

तंत्रज्ञानाच्या युगात सध्या आपल्याला सर्व घरी बसल्या सहज उपलब्ध होत आहे. जेवणापासून घरच्या वस्तूंपर्यंत आणि इलेक्ट्रिक सामानापासून कपड्यांपर्यंत सर्व ऑनलाईन मिळतं. साहजिकच ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढत चालली आहे. पण त्याचबरोबर ऑनलाईन फ्रॉडचे प्रकारही वाढू लागले आहेत.

आरोपी फसवणूकीचे नवनविन प्रकार शोधून काढत असून लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. फसवणूकीचा असाच एक प्रकार समोर आला आहे.

एका विद्यार्थिनीने 510 रुपयांचा ड्रेस ऑनलाईन मागवला, पण सायबर गुन्हेगारांनी या मुलीच्या अकाऊंटमधून तब्बल 3 लाख रुपये लंपास केले.

गोपालगंज इथली ही घटना आहे. चुना गली परिसरात राहणाऱ्या साक्षी कुमारी या विद्यार्थिनीला ऑनलाईन फसवणूकीला सामोरं जावं लागलं. ऑनलाईन सर्च करत असताना साक्षीला एक ड्रेस आवडला. हजारात असणार हा ड्रेस ऑफरमध्ये केवळ 510 रुपयांत मिळत होता.

साक्षीला तो ड्रेस आवडल्याने तीने तो ऑनलाईन ऑर्डर केला. ड्रेस खरेदी केल्यानंतर साक्षीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यानंतर साक्षीला एक फोन आला, फोनकर्त्याने आपण ऑनलाईन कंपनी ‘मीशो’चा अधिकारी असल्याचं सांगितलं.

तुम्हाला लकी ड्रॉमध्ये पहिलं बक्षीस लागलं असून यात तुम्हाला 12 लाख 60 हजार रुपये कॅश किंवा टाटा सफारी कार जिंकल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर फोन करणाऱ्या त्या व्यक्तीने कंपनीचं आयकार्ड आणि आधारकार्डची कॉपी तिच्या मोबाईलवर पाठवली.

बक्षिस मिळवण्यासाठी आला फोन
त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा साक्षीला फोन केला. लकी ड्ऱॉमध्ये लागलेलं बक्षिस मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स, सिक्यूरिटी चार्जेस, टीडीएस, जीएसटी असे सर्व मिळून 3 लाख रुपये दिलेल्या अकाऊंटला ट्रान्सफर करायला सांगितले.

साडेबारा लाखांच्या बक्षिसाच्या अपेक्षेने साक्षीने 3 लाख रुपये संबंधित अकाऊंटला ट्रान्सफर केले, आणि इथेच ती फसवली गेली. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर साक्षीला कोणताच मेसेज आला नाही. म्हणून साक्षीने पुन्हा त्या नंबरवर फोन केला, पण फोन बंद होता. आपण फसवलो गेल्याचं साक्षीच्या लक्षात आलं.

फसवणूकीबाबत केली पोलिसांत तक्रार
फसवणूक झाल्याचं कळताच साक्षीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सायबर पोलिस याप्रकरणी तपास करत असून बक्षिस मिळण्याच्या अपेक्षेने गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. एकट्या गोपालगंजमध्ये गेल्या सहा महिन्यात ऑनलाईन फसवणूकीची 45 प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑनलाइन फसवणूक

संबंधित बातम्या

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

June 22, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बाबो..! स्विस बँकेत भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला; आकडा ऐकून डोकं गरगरेल

June 24, 2025
नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

June 21, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

भयानक! ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले; तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

June 17, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट

June 13, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

June 12, 2025
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सवलती रद्द! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो सावधान; बोर्डाने बदलले 'हे' दोन नियम

ताज्या बातम्या

अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मी पुन्हा आलो..! मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांची बदली; त्यांच्या जागी वादग्रस्त तहसीलदार प्रदीप शेलार यांची नियुक्ती

July 1, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

संतापजनक! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने बापाने केला साडीने गळा आवळून चिमुरडीचा खून; मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर बाप अटकेत

June 30, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

June 30, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

June 30, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विठुरायाची भेट अपूर्णच राहिली; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

June 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा