mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऑनलाईन खरेदी करताय, सावधान; 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 12, 2022
in मनोरंजन, राष्ट्रीय
सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

टीम मंगळवेढा टाईम्स। 

तंत्रज्ञानाच्या युगात सध्या आपल्याला सर्व घरी बसल्या सहज उपलब्ध होत आहे. जेवणापासून घरच्या वस्तूंपर्यंत आणि इलेक्ट्रिक सामानापासून कपड्यांपर्यंत सर्व ऑनलाईन मिळतं. साहजिकच ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढत चालली आहे. पण त्याचबरोबर ऑनलाईन फ्रॉडचे प्रकारही वाढू लागले आहेत.

आरोपी फसवणूकीचे नवनविन प्रकार शोधून काढत असून लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. फसवणूकीचा असाच एक प्रकार समोर आला आहे.

एका विद्यार्थिनीने 510 रुपयांचा ड्रेस ऑनलाईन मागवला, पण सायबर गुन्हेगारांनी या मुलीच्या अकाऊंटमधून तब्बल 3 लाख रुपये लंपास केले.

गोपालगंज इथली ही घटना आहे. चुना गली परिसरात राहणाऱ्या साक्षी कुमारी या विद्यार्थिनीला ऑनलाईन फसवणूकीला सामोरं जावं लागलं. ऑनलाईन सर्च करत असताना साक्षीला एक ड्रेस आवडला. हजारात असणार हा ड्रेस ऑफरमध्ये केवळ 510 रुपयांत मिळत होता.

साक्षीला तो ड्रेस आवडल्याने तीने तो ऑनलाईन ऑर्डर केला. ड्रेस खरेदी केल्यानंतर साक्षीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यानंतर साक्षीला एक फोन आला, फोनकर्त्याने आपण ऑनलाईन कंपनी ‘मीशो’चा अधिकारी असल्याचं सांगितलं.

तुम्हाला लकी ड्रॉमध्ये पहिलं बक्षीस लागलं असून यात तुम्हाला 12 लाख 60 हजार रुपये कॅश किंवा टाटा सफारी कार जिंकल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर फोन करणाऱ्या त्या व्यक्तीने कंपनीचं आयकार्ड आणि आधारकार्डची कॉपी तिच्या मोबाईलवर पाठवली.

बक्षिस मिळवण्यासाठी आला फोन
त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा साक्षीला फोन केला. लकी ड्ऱॉमध्ये लागलेलं बक्षिस मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स, सिक्यूरिटी चार्जेस, टीडीएस, जीएसटी असे सर्व मिळून 3 लाख रुपये दिलेल्या अकाऊंटला ट्रान्सफर करायला सांगितले.

साडेबारा लाखांच्या बक्षिसाच्या अपेक्षेने साक्षीने 3 लाख रुपये संबंधित अकाऊंटला ट्रान्सफर केले, आणि इथेच ती फसवली गेली. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर साक्षीला कोणताच मेसेज आला नाही. म्हणून साक्षीने पुन्हा त्या नंबरवर फोन केला, पण फोन बंद होता. आपण फसवलो गेल्याचं साक्षीच्या लक्षात आलं.

फसवणूकीबाबत केली पोलिसांत तक्रार
फसवणूक झाल्याचं कळताच साक्षीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सायबर पोलिस याप्रकरणी तपास करत असून बक्षिस मिळण्याच्या अपेक्षेने गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. एकट्या गोपालगंजमध्ये गेल्या सहा महिन्यात ऑनलाईन फसवणूकीची 45 प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑनलाइन फसवणूक

संबंधित बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
बापाचे पाऊल वाकडे पडले,मुलाने त्याला यमसदनी धाडले; बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले

धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या

July 12, 2025
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

July 9, 2025
मंगळवेढा ‘या’ ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट; आजी-माजी सैनिकांना कर सवलत देण्याचा केला ठराव

Bharat Bandh : २५ कोटी कामगार संपावर, आज भारत बंद; कोण कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

July 9, 2025
एक लाख वारकरी विठ्ठल मंदिरासमोर आज ठिय्या आंदोलन करणार; वंचितच्या आंदोलनाला सरकार घाबरले

उद्याचा दिवस फार खास! आषाढी एकादशीला ‘या’ 5 राशींना पावणार विठोबा; समोर आलेलं संकट करणार दूर, धनलाभाचे संकेत?

July 5, 2025
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

हृदयविकारामुळे मृत्यूचा ‘या’ लसीशी कोणताही संबंध नाही; अचानक ‘हार्ट ॲटॅक’ मागे अनेक कारणे; केंद्र सरकार दिले स्पष्टीकरण

July 3, 2025
खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सवलती रद्द! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो सावधान; बोर्डाने बदलले 'हे' दोन नियम

ताज्या बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता सातबाराची गरज भासणार नाही ; फक्त ‘हा’ क्रमांक असणार बंधनकारक

July 13, 2025
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा