मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पंढरपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर , नर्सेस आणि अन्य स्टाफ अशा सर्व ४९ लोकांच्या दोन्ही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत
मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील एका महिलेची पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली होती. त्यानंतर संबंधित महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली होती . प्रशासनाने तातडीने संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधून त्या महिलेच्या संपर्कात आलेले डॉक्टर , नर्स आणि अन्य व्यक्तींची यादी तयार केली आणि त्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले होते.
तिच्या संपर्कात आलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टर , नर्सेस आणि अन्य स्टाफ अशा ४९ जणांच्या स्वब टेस्ट घेण्यात आल्या होत्या. त्या सर्वांचे पहिल्या चाचणीतील रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस आणि अन्य स्टाफ यांच्याबाबतीत काही दिवसांनंतर दुसऱ्यांदा चाचणी घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार चार मे रोजी पुन्हा ४९ जणांची दुसऱ्यांदा टेस्ट घेण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून सर्व ४९ लोकांचे दुसऱ्या चाचणीमधील रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत.
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज