टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक पोलीस हवालदार हे मासिक हप्ते वसूली करीत असून त्यांना तात्काळ निलंबीत करावे.
अन्यथा २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी अज्ञात ठिकाणी आत्मदहन कण्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे दामाजीनगर ग्रामपंचायतीचे सदस्य आण्णासो आसबे यांनी देताच, त्या पोलीस हवालदाराची तात्काळ उचलबांगडी सोलापूर पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे.
अण्णासो आसबे यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे हे अवैध व्यवसायिकाकडून मंथली वसूली करतात.
यामुळे अवैध व्यवसायांना बळ मिळत असल्याने हे व्यवसाय वाढून अनेकांचे संसार रस्त्यावर येवू पाहत आहेत. यापूर्वीही याबाबतची तक्रार करुनही त्याची दखल वरिष्ठांनी घेतली नव्हती.
दि.२ ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी आपण अज्ञात ठिकाणी आत्मदहन करणार असून होणाऱ्या परिणामास संबंधीत पोलीस अधिकारी व तो पोलीस कर्मचारी जबाबदार राहील असा इशारा दिला होता.
याची दखल जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी घेऊन दि.२३ सप्टेंबर २०२३ रोजी लेखी आदेश काढून संबंधित पोलीस हवालदारची मंगळवेढा येथून सोलापूर पोलीस मुख्यालयात तात्काळ उचबांगडी करण्यात आली आहे.
कार्यमुक्त केल्याचा अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान त्या कर्मचाऱ्याची पोलीस मुख्यालयात झालेली बदली प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे अधिकारी सांगत आहेत तर ही बदली माझ्याच तक्रारीवरुन झाली असल्याचा दावाही आण्णासो आसबे यांनी केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज