टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या एका 70 वर्षीय वृध्द महिलेच्या गळयातील 30 हजार रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र
जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेण्याचा प्रकार रात्री 12.30 वा. घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सुभद्रा कुंडलिक भोसले या गोणेवाडी येथील राहते घराच्या पोर्चमध्ये त्या व त्यांचे पती झोपले असता
रात्री 12.30 वा.एका 30 ते 35 वर्षीय तरूणाने फिर्यादीच्या गळयात हात घालून जबरदस्तीने हिसडा मारून तोडून घेवून गेले आहेत.
दरम्यान यामध्ये 5 सोन्याचे मोठे मणी,33 सोन्याचे लहान मणी,दोन सोन्याच्या वाटया असे 7 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र चोरून नेले आहे.
याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज