टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. याआधी या योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती.
परंतु, आता ही अट काढून टाकण्यात आली असून, ही मर्यादा आता 65 वर्ष करण्यात आली आहे, अशी माहिती शिंदेंनी सभागृहात दिली आहे. याशिवाय जमिनीच्या मालकीचीदेखील अट काढण्यात आली आहे.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नेमकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तरी काय? त्या योजनेसाठी कोण पात्र आहेत? त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? जाणून घेऊया..
या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी पहिले महिलांना 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, आता यात वयाच्या अट वाढवण्यात आली असून, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
शिवाय जमिनीबाबतची अटही काढूण टाकण्यात आली आहे.
ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जातील.
कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थी 21 ते 60 वय असलेली महिला असेल. तसंच, त्यांचं वर्षाला उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी असावं अशी आहे.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 6 वर्षांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार.
4) लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1) रेशन कार्ड
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म दाखला.
4) उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खाते झेरॉक्स.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज