मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्याच्या काही भागातील अवकाशात गुरुवारी सकाळी मोठा आवाज ऐकायला मिळाला. मोठ्या वाहनाचा टायर फुटल्यावर येतो तास आवाज झाला.
या आवाजामुळे लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. दरम्यान, हा आवाज सुपर सॉनिक विमानाचा असावा, जमिनीवर कुठेही काही नुकसानीची माहिती नाही
गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागात मोठा आवाज ऐकावयास आला. अवकाशात् मोठ्या वाहनाचा टायर फुटल्यावर येतो तशा प्रकारचा धमाकेदार आवाज झाला.
मंगळवेढा शहराच्या काही भागात घरांच्या खिडक्या थरथरल्या, स्वयंपाक घरातील भांडी खणखणली, अचानक झालेल्या या आवाजामुळे भूकंप झाला काय, या शंकेने नागरिक घरातून बाहेर आले आणि सर्वांकडे चौकशी करू लागले.
ग्रामीण भागातही २० ते २५ गावांच्या परिसरात या प्रकारचा आवाज ऐकू आल्याने भूकंप झाल्याची अफवा पसरली होती. यापूर्वी काही वर्षांपूर्वी अशा प्रकारे आकाशात आवाज ऐकू आला होता. (दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज