टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक सिद्धेश्वर धसाडे यांचा आज रविवार दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता सेवाप्रती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा तालुका शिक्षक संघ व तालुका परिवार यांनी दिली आहे.
विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
याप्रसंगी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात,
खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, शिक्षक संघाचे राज्य सल्लागार बाळासाहेब काळे, ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तमराव जमदाडे, जिल्हा शिक्षण अध्यक्ष विरभद्र यादवाड, शिक्षक नेते शिवानंद भरले,
मंगळवेढ्याचे गटशिक्षणाधिकारी बजरंग पांढरे, शिक्षण विस्तार अधिकारी पोपट लवटे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.बिभीषन रणदिवे अभिनंदन उपस्थित राहणार आहेत.
सिद्धेश्वर धसाडे यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवले असून विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण यश मिळवले आहे.
सिद्धेश्वर धसाडे यांच्या कार्यकाळात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर देखील होते, शाळा परिसरात झाडे लावणे, गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे
आज मुंढेवाडी ता.मंगळवेढा येथे दुपारी 3 वाजता हा शिवापूर्ती सन्मान सोहळा होणार असून या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच सौ.सविता पाटील व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज