टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता राज्याची चिंता लागून राहिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं नियंत्रण मिळवलं असलं तरी आता कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरीकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्यामध्ये 1,357 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दैनंदिन आकडा वाढत असताना चिंता वाढली आहे.
शुक्रवारी राज्यात 1,034 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच, 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. त्याचबरोबर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
त्यानंतर काल शनिवारी हा आकडा थेट 1,357 वर नोंदवण्यात आला आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 8.06 टक्के आहे. तसेच, मृत्यूदर 1.87 टक्क्यांवर नोंदवण्यात आलाय.
आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले.
‘आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे.
त्या संख्येमुळे केंद्रीय आरोग्य विभागानं आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील.
या पार्श्वभूमीवर आता मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे.’ असं राजेश टोपे म्हणाले (स्रोत:पोलीसनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज