टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथे लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असून यामध्ये नामदेव विठोबा गावडे यांच्या घरातील जीवनाश्यक व संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली आहे.
ही माहिती मिळताच मंडळ अधिकारी नागनाथ जोध, तलाठी मनोजकुमार संकपाळ यांनी त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन तात्काळ पंचनामा करून स्वतःच्या खिशातील 5 हजारांची मदत केली.
शेतकऱ्याच्या मदतीला मंडळ अधिकारी नागनाथ जोध, तलाठी मनोजकुमार संकपाळ हे धावून गेले या कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मानेवाडी येथील नामदेव विठोबा गावडे यांचे घर काल रात्री दीड वाजण्याचे सुमारास विद्युत जोडणी शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाले.
यात घरात असणारे सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. याबद्दल मानेवाडी गावचे सरपंच यांनी मंडळअधिकारी नागनाथ जोध यांना फोन करून सांगितले होते.
तात्काळ मंडलाधिकारी जोध यांनी मानेवाडीचे तलाठी मनोजकुमार संकपाळ, कोतवाल विजय चव्हाण व मारोळीचे कोतवाल अशीम सनदी यांना घेऊन घटनास्थळी जाऊन तात्काळ पंचनामा केला.
सर्व संसार उघड्यावर असल्याने त्यांना सहानुभूती म्हणून व त्यांना परत त्यांचा संसाराचा गाडा उभा करता यावा म्हणून मंडलाधिकारी नागनाथ जोध व तलाठी मनोजकुमार संकपाळ या दोघांनी मिळून त्यांचे जवळील 5 हजार रुपये रोख स्वरूपात मदत केली.
यावेळी मानेवाडी गावचे सरपंच दादा मळगे व मानेवाडी गावचे ग्रामसेवक इनामदार व सर्व शेतकरी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज