टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील हरी धुळा सुळ यांचे चिरंजीव सूरज हरी सूळ हे 2021 च्या MPSC च्या विक्रीकर निरिक्षक पदी NT -C मधून महाराष्ट्रात 10 व्या क्रमांकाने निवड झाली.
घरची हालाकीची परिस्थिती वडीलांची जीद्द व सूरज चा संयम मजबूत होता. कोरोनामुळे MPSC च्या अनेक परिक्षा होवू शकल्या नाहीत, अशा अवस्थेत तग धरून कष्टाला यश प्राप्त झाले.
सूरजचे 1 ली ते 7 वी नूतन मराठी विद्यालय मंगळवेढा येथे व 8 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण हे श्री विलासराव देशमूख विद्यालय, दामाजी स. सा. कारखाना येथे झाले.
११ वी, १२ वी व BA हिंदी. चे शिक्षण दामाजी कॉलेज, मंगळवेढा येथे झाले. पूढील mpsc अभ्यासासाठी हिंगोली, वर्धा चे तहसिलदार सतिश मासाळ व श्रीधर खांडेकर (माजी संचालक दामाजी सहकारी साखर कारखाना )यांच्या मार्गदर्शना खाली शिक्षणासाठी पुणे येथे गेला.
सूरज अभ्यासाला गेला असता सर्व शिक्षक व मित्रांचे मोलाचे मार्गदर्शन व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. निवड झाल्या नंतर सर्व गावाला हेवा वाटला व आनंदाने भारावून गेले.
निवड झाल्या बद्दल सर्व मित्रांनी व गावकऱ्यांनी गावात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
सूरजच्या यशाबद्दल अरविंद पाटील सर, नरेंद्र खांडेकर सर, दत्तात्रय कोळी, बाळासाहेब खंकाळ, समाधान मेटकरी, बबन लोंढे, नागेश साखरे, मारुती शिंदे व समस्त ग्रामस्थ उचेठाण यांनी अभिनंदन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज