मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या पत्नीने एमपीएससी परीक्षा पास होत PSI पोस्ट मिळवली आहे. पोलीस दलात कॉन्स्टेबल असताना ती ड्यूटी बदलून अभ्यास करण्यासाठी गार्डची ड्यूटी बदलून ग्रामीण पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबलने मोठं यश संपादन केलं आहे.
एमपीएससीचा निकाल नुकताच लागला आहे. मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये तैनात.. शेतकरी पतीच्या कुटुंबियांनी सुद्धा भरपूर साथ दिल्याचं क्रांती पवार जाधव यांनी, क्रांती पवार जाधव यांनी आपल्या या यशाच रहस्य सांगितलं आहे.
अभ्याससाठी भरपूर मेहनत, मनात जिद्द होती. मोहोळ तालुक्यातील कुरुल कामती या गावातील शेतकरी किसनदेव जाधव हे शेती करतात. पत्नी क्रांती पवार जाधव या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या.
शेतकरी असलेल्या पतीने एमपीएससीचा अभ्यास करण्याचा आग्रह धरला. शिवाय यासाठी प्रोत्साहनही दिलं. शिवाय सासू-सासरे, आई – बहीण, भाऊ यांनी देखील साथ दिली. मुलगा लहान असल्यामुळे चिंता असायची.
पण कुटुंबियांनी त्याचा अगदी व्यवस्थितपणे सांभाळ केल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देता आल्याचं देखील पवार म्हणाल्या.
शेतकरी पतीने साथ दिल्यामुळे क्रांती पवार जाधव यांनी एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा दिल्या असून त्याचा निकाल, सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मुख्यालयात तैनात असलेल्या क्रांती पवार जाधव यांची मंगळवेढा पोलीस ठाणे इथे बदली झाली होती.
पोलीस स्टेशन मिळाल्याने कामाचा व्याप मोठा होता. अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. त्यासाठी क्रांती पवार यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनची ड्युटी बदलून गार्ड ड्यूटी मागितली होती.
यामुळे २४ तास ड्यूटी केल्यानंतर २४ तास सुट्टी मिळायची. यातून मिळालेल्या वेळेत त्या अभ्यास करत होत्या. वेळेचं नियोजन, सातत्य, रिव्हिजन तसंच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश नक्कीच मिळेल, असा संदेशही त्यांनी नवउमेदवारांना दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज