टीम मंगळवेढा टाईम्स ।
नातेवाईकाच्या घरून टि.व्ही. पाहून एक अल्पवयीन मुलगी घराकडे परतत असताना अंधाराचा गैरफायदा घेवून तीच्या तोंडावर मोबाईलच्या बॅटरीचा फोकस मारून
उचलून नेवून शेतात बळजबरीने अत्याचार केल्याप्रकरणी सहदेव उर्फ साधू परमेश्वर चव्हाण याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून ही घटना मंगळवेढा तालुक्यातील एका खेडयामध्ये घडली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील अल्पवयीन मुलगी तथा पिडीता रात्री ९ .०० वा . टि.व्ही. पाहण्यासाठी गावात एक जणाच्या घरी गेली होती.
ती टि.व्ही.पाहून तीच्या घराकडे परतत असताना आरोपीने तीला अंधारात मोबाईलच्या बॅटरीचा उजेड तोंडावर मारून
तीला उचलून बाजूच्या शेतात नेवून बळजबरीने अत्याचार करून या घटनेबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पंढरपूर विभागाचे डी वाय.एस. पी . विक्रम कदम व पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सदर घटना स्थळाला भेट देवून घटनेबाबत माहिती जाणून घेतली. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसो पिंगळे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज