टीम मंगळवेढा टाईम्स ।
जेसीबी व सोने घेण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सतत छळाला व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
खुपसंगी (ता. मंगळवेढा) गावात ही घटना घडली असून, विवाहितेचे वडील उत्तम भाउ माने (रा.आगलावेवाडी, जवळा ता.सांगोला) यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी पती, दीर, जाऊ, सासू व सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुजाता नितीन मेटकरी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून पती नितीन सोपान मेटकरी, सासरे सोपान सिध्दु मेटकरी व सासु मंगल सोपान मेटकरी, दिर सचिन सोपान मेटकरी व जाउ पल्लवी सचिन मेटकरी (रा.खुपसंगी ता.मंगळवेढा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना दि.२१ मे २०१९ रोजी ते दि.१३ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पती, पती, सासरे सासू, दीर, जाऊ हे फिर्यादीच्या मुलगी सुजाता हिस जेसीबी आणण्यासाठी पैसे व सोने आणण्याच्या व वेगळे राहण्याच्या कारणावरून क्रूरपणे वागवत होते.
दि.१३ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तिच्या राहत्या घरी बेडरूममध्ये पत्राच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील पाचः जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज