टीम मंगळवेढा टाईम्स ।
विवाहासाठी सर्व पाहुणे घरी आले असताना निकाह काही तासात होणार असताना नवरी मुलीने राहत्या घरी बेडरुममधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सालिया महेबुब शेख (वय २५, रा. ओम नम : शिवाय नगर, कुमठेगाव रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणेसहा वाजता उघडकीस आला.
सालिया शेख हिचा विवाह आज होणार होता. घरी पाहुणेही आले होते. दरम्यान, सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी बेडरुममधील सिलिंग फॅनला तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने खाली उतरवुन बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात आणले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
या घटनेची माहिती मिळताच शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. विजापूर नाका पोलीस तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज