टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथून 30 वर्षीय विवाहित महिला व तीची 6 वर्षाची मुलगी अशा मायलेकी बेपत्ता झाल्या असून
या प्रकरणी तीच्या पतीने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.दरम्यान,त्या बेपत्ता महिलेचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
दि.9 रोजी सकाळी 11.00 वा. यातील बेपत्ता विवाहिता ही तीच्या वहिनीला मंगळवेढा येथे दवाखान्याला घेवून गेली होती.
तीचे पती दुपारी 2.00 वा.पंढरपूर येथे गेले होते.पती रात्री 9.15 वा. घरी आले.तेव्हा घरामध्ये पत्नी व 6 वर्षीय मुलगी दिसली नाही.
याबाबत मुलाकडे चौकशी केली असता मम्मी रात्री 8.00 वा.घरातून मला काही न बोलता निघून गेल्याचे सांगितले. तदनंतर कुटुंबियांनी गावात व पै पाहुण्याकडे सर्वत्र शोध घेतला.
मात्र ती मिळून आली नाही.तीचे वर्णन -उंची 5 फुट 5 इंच,रंग काळा सावळा,अंगाने सडपातळ,अंगात मोरपंखी साडी व हिरवा ब्लाऊज,सोबत 6 वर्षाची मुलगी असून तीचे अंगात लाल रंगाचा टॉप व पँट,उंची 3 फुट,रंग गोरा,
अंगाने सडपातळ अशा वर्णनाच्या दोघी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज