टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द येथे एका १६ वर्षीय मुलाने अज्ञात कारणावरून पत्र्याच्या शेडच्या छतास अँगलला साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आदित्य राजाराम टिक्के असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव असून आकस्मात मयत अशी नोंद पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील खबर देणारे उमेश नामदेव टिक्के यांचा पुतण्या मयत आदित्य टिक्के याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून दि.२० रोजी दुपारी १२ ते ५ या दरम्यान त्याचे राहते घरालगत असलेल्या शेळया बांधण्याच्या पत्र्याच्या
शेडच्या छताच्या अँगलला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे.
याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार हिप्परकर हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज