mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यात आणखी एका ग्रामपंचायतीची निर्मिती होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा तालुक्यात आणखी एका ग्रामपंचायतीची निर्मिती होणार

मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा तालुक्यासाठी संत दामाजी नगर व चोखामेळा नगर या दोन ग्रामपंचायती नंतर आणखीन एक ग्रामपंचायतिची निर्मिती केली जाणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील कान्होपात्रा ग्रामपंचायत स्वतंत्र करण्याचाही निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान डॉ.दत्तात्रय माळी यांनी कान्होपात्रा ग्रामपंचायत होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.

‘हायमास्ट’चा 41 लाखांचा निधी खर्च वादात

जिल्हा परिषदेच्या 41 लाखांच्या निधीतून हायमास्ट दिवे बसविण्याचा विषय सोमवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला. मात्र, हा निधी कोणत्या विभागाकडून खर्च करण्यात येत आहे, त्याचे निकष काय असणार, याची माहिती अधिकार्‍यांना देता आली नाही, त्यामुळे सभेत हा विषय नामंजूर करण्यात आल्याची माहिती जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात दुपारी अध्यक्ष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. हायमास्ट दिव्यांच्या खरेदीच्या विषयाबाबत जि.प. अध्यक्ष व बांधकाम समितीच्या सभापतींनाही प्रशासनाने पूर्वकल्पना दिली नसल्याचे यावेळी दिसून आले.

त्यामुळे हा विषय सभेपुढे सादर केलेल्या बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या अधिकार्‍यांना पदाधिकार्‍यांनी चांगलेच धारेवर धरले.

अकलूज-माळेवाडी नगरपरिषद करण्याचा, तर महाळूंग-श्रीपूर ग्रामपंचायती नगरपंचायती करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. हातपंप दुरुस्तीसाठी 50 लाखांचा निधी, तर हातपंप पाईप खरेदीसाठी 41 लाखांच्या निधी तरतूदीस यावेळी मान्यता देण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील ग्रामपंचायतीला व्यापारी गाळे बांधकाम करण्यासाठी जिल्हा ग्राम विकास निधीतून 22 लाखांचे कर्ज मंजूर करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

पंढरपूर तालुक्यातील करोळे ग्रामपंचायतीस व्यापारी गाळे बांधकामासाठी 7 लाख 50 हजारांचा कर्ज मंजूर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जि.प. आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांना प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी 35 लाखांचा निधी खर्च करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. मंगळवेढा तालुक्यातील बेगमपूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकामासाठी प्रत्येकी 31 लाखांच्या निधी खर्चासही यावेळी मान्यता देण्यात आली.

जिल्हाभरात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे रस्ते व अन्य मालमत्ता खोदून केंद्र शासनाने नेमलेल्या कंपन्याकडून केबल घालण्याचे काम सुरु आहे. या कंपन्यांचा शोध घेऊन नुकसान भरपाई जिल्हा परिषदेला मिळविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. अनुकंपा तत्वावरील रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने करण्याचेही आदेश यावेळी प्रशासनाला देण्यात आले. खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचेही समायोजन तातडीने करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बीओटी तत्वावर विकसित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचेही आदेश यावेळी प्रशासनास देण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, पक्षनेता आनंद तानवडे, सदस्य अरुण तोडकर आदी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अकरा वर्षांच्या मुलीची ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

अकरा वर्षांच्या मुलीची ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 2, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा