मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे , यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत , असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत .
महिलाअधिकारी – कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या . सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली . यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , महासंघाचे संस्थापक ग . दि . कुलथे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .
केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसाचा आठवडा करावा , या मागणीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले . पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विचार सरकार करत आहे . दिवसाच्या कामकाजाची ४५ मिनिटेवाढवून , अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्यादृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही , अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करावा . त्यावर निर्णय लवकरच घेण्यात येईल , असे त्यांनी यावेळी सांगितले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज