मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा
एसटी अपघात १४ प्रवाशी जखमी
समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी खड्यामध्ये आदळून सीना नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकली . या अपघातामध्ये तीन प्रवाशी गंभीर तर ११ प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवार , दि . ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ : ३० वाजनेच्या सुमारास तालुक्यातील मालिकपेठ येथे घडली .
एसटी चालक इस्माईल मुलाणी यांच्या प्रसंगावधानामुळे एसटीमधील सुमारे ६३ प्रवाशी बचावले . याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बार्शी आगाराची ( एसटी क्र . एम – एच – ०७ सी ७३३३ ) ही वैरागहून मोहोळकडे येत असताना मलिकपेठ येथील सीना नदीच्या पुलाच्या जवळ समोरून एका भरधाव वेगात येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नांमध्ये खड्यांमध्ये आदळली व तदनंतर ती तशीच पुढे सीना नदीच्या पुलावर असलेल्या कठड्यावर घासत गेली .
एसटी चालक इस्माईल मुलाणी यांनी वेळीच प्रसंगावधान राखत सतर्कतेने एसटीवर ताबा मिळविला . अन्यथा पुलावरून खाली वीस ते पंचवीस फूट खोल सीना नदीच्या पत्रात पाण्यामध्ये एसटी पडली असती . मात्र , या अपघातात तीन प्रवाशी गंभीर तर ११ प्रवाशी किरकोळ जखमी झाले , जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज